बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Scott Morrison यांचा एक व्हिडीओ पोस्ट करुन लोकशाही म्हणजे काय? हे देशवासीयांना सांगितलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“लोकशाही कशी दिसते हे पाहायचे आहे का? एका व्यक्तीने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना पत्रकार परिषद सुरु असताना आपल्या लॉनमधून खाली उतरण्यास सांगितले. अन् पंतप्रधान त्या व्यक्तीची माफी मागत खाली उतरले. याला म्हणतात खरी लोकशाही.” अशा आशयाचं ट्विट करुन विशालने लोकशाही म्हणजे काय देशवासीयांना सांगितलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा : अभिनेत्याने लॉकडाउनमध्ये घरातच तयार केला चित्रपट

यापूर्वी विशालने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला होता. “चीन अजुनही भारताच्या जमीनीवर ठाण मांडून बसलाय. देशातील करोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अन् आपले नेते हे महत्वाचे मुद्दे सोडून बॉलिवूडवर चर्चा करतायत. ही राजकारणी मंडळी आपल्याला मुर्ख बनवत आहेत. पद्धतशीरपणे आपली दिशाभूल करत आहेत.” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं.