News Flash

रिमिक्स गाण्यांवर बहिष्कार टाकावा का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर विशाल ददलानीने दिलं ‘हे’ उत्तर

वाचा नेमकं काय आहे प्रकरण

रिमिक्स गाण्यांवर बहिष्कार टाकावा का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर विशाल ददलानीने दिलं ‘हे’ उत्तर

अभिनेता राजकुमार राव आणि नुशरत भरुचा यांचा ‘छलांग’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘दिदार दे’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं रिमिक्स असून प्रेक्षकांना ते फारसं भावल्याचं दिसून येत नाही. विशेष म्हणजे या रिमिक्स गाण्यावर विशाल आणि शेखर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

“आम्ही २००४ मध्ये हे मूळ गाणं तयार केलं होतं. त्यामुळे या रिमिक्सच्या वेळी आम्हाला क्रेडिट देण्यात आलं आहे. पण आम्ही हे रिमिक्स तयार केलेलं नाही. चित्रपटाच्या टीमसाठी आणि चित्रपटासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. तसंच इतके वर्ष आमच्या गाण्यावर प्रेम केल्यामुळे सगळ्याचे आभार”, असं ट्विट विशालने केलं आहे.


त्याच्या ट्विटवर अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. यात ‘९० च्या दशकातील गाण्यांचं रिमिक्स केल्यास त्याला बॉयकॉट करावं का?’ असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारलं. विशेष म्हणजे ‘नक्कीच करु शकता’, असा रिप्लाय विशालने दिला आहे.

दरम्यान, ‘दिदार दे’ हे मूळ गाणं संगीतकार विशाल-शेखर आणि सुनिधी चौहान यांनी गायलं आहे. तर याचं रिमिक्स गाणं असीस कौर आणि देव नेगी यांनी गायलं आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. तर निर्मिती अजय देवगण, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 5:45 pm

Web Title: vishal shekhar clarify theyre not behind deedar de remix twitter user blames them destroying og song dcp 98
Next Stories
1 शिल्पा शेट्टीच्या पतीने केले रणवीर सिंहला कॉपी? शेअर केला मजेशीर व्हिडीओ
2 ‘वाजवुया बँडबाजा’ चित्रपट लवकरत १५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस
3 भूमी पेडणेकरने शेअर केला खास फोटो; म्हणाली…
Just Now!
X