News Flash

अमृता राव आणि अनमोल विवाहबंधनात!

'इश्क-विश्क' चित्रपटाद्वारे अमृताने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते

| May 16, 2016 05:56 pm

Amrita Rao tied the knot with RJ Anmol : 'विवाह', 'मै हू ना' या चित्रपटांतील अमृता रावच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

प्रिती झिंटा आणि बिपाशा बासू यांच्यानंतर आता आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. अमृता रावने सोमवारी रेडिओ जॉकी अनमोलबरोबर लग्नगाठ बांधली. अमृता आणि अनमोलचा लग्नसोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि मोजके नातेवाईक उपस्थित होते. गेल्या सात वर्षांपासून अमृताने अनमोलबरोबरचं आपले नाते कधीच सार्वजनिक केले नव्हते. अमृता सध्या ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेमध्ये काम करत आहे. ‘इश्क-विश्क’ चित्रपटाद्वारे अमृताने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, तर ‘सत्याग्रह’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. याशिवाय, ‘विवाह’, ‘मै हू ना’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 5:56 pm

Web Title: vivah actress amrita rao tied the knot with rj anmol after seven years of dating
टॅग : Bollywood,Entertainment
Next Stories
1 हृतिक-यामीच्या ‘काबिल’मध्ये गिरीश कुलकर्णी!
2 VIDEO: .. म्हणून आर्ची-परश्याला सोडावा लागला स्टेज
3 शिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा ‘कॉपी’; गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न