News Flash

दिग्दर्शकानं बिहार पोलिसांवर केली टीका; ट्रोलिंग होताच मागितली माफी

बिहार पोलिसांना बी ग्रेड राजकारणी म्हणणाऱ्या दिग्दर्शकानं मागितली माफी; म्हणाला...

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते आपली मतं रोखठोक मांडतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी त्यांनी सुशांत मृत्यू प्रकरणाच्या निमित्ताने बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु ट्रोलिंग सुरु झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची माफी मागितली आहे.

अवश्य पाहा – “तुझं तू बघून घे, माझ्या बायकोला यात आणू नकोस”; सुशांतच्या भावोजींचा तो मेसेज झाला व्हायरल

काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?

“माफ करा पण हे पोलीस आहेत की बी ग्रेड राजकारणी? अशा प्रकारचा व्यवहार कुठलाही नॅशनलिस्ट सहन करणार नाही. जनतेनं आवाज उठवला नाही तर पोलीस राजकारण करतील आणि माध्यमं त्यांना प्रोत्साहन देतील.” अशा आशयाचं ट्विट करुन विवेक अग्निहोत्री यांनी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका केली होती. परंतु या ट्विटमुळे त्यांना ट्रोल केलं गेलं. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. अखेर सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून विवेक अग्निहोत्री यांनी आपलं ट्विट डिलिट केलं. शिवाय डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची माफी देखील मागितली.

“माझ्या प्रिय मित्रांनो गुप्तेश्वर पांडे यांच्याबाबत केलेलं ट्विट मी डिलिट करत आहे. माझा गैरसमज झाला होता. मी देखील सुशांत प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी करत आहे. झालेल्या चुकीसाठी मला माफ करा.” अशा आशयाचं ट्विट करुन विवेक अग्निहोत्री यांनी माफी मागितली. सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 1:51 pm

Web Title: vivek agnihotri bihar dgp gupteshwar pandey sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार भावनिक वळण
2 ‘फुलराणी’ची होणार रुपेरी पडद्यावर एण्ट्री
3 Birth Anniversary : किशोर कुमार यांनी गायलेली ही तीन मराठी गाणी तुम्हाला माहिती आहेत का?
Just Now!
X