27 September 2020

News Flash

विवेक ओबेरॉयने ऐश्वर्याला दिले होते हे खास गिफ्ट

ऐश्वर्याच्या ३०व्या वाढदिवसा निमित्त विवेकने गिफ्ट दिले होते

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा आज ३ सप्टेंबर रोजी ४२ वा वाढदिवस आहे. विवेकचा जन्म १९७६ साली ओबेरॉय कुटुंबामध्ये झाला. २००२मध्ये विवेकने राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. विवेकचे नाव घेतले की सर्वांना ऐश्वर्या राय आणि सलमान खानचीदेखील आठवण होते.

ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या रिलेशनच्या त्यावेळी जोरदार चर्चा सुरु होत्या. सलमान आणि ऐश्वर्याची ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. परंतु त्यांच्यात सतत भांडण होत असे आणि अखेर त्यांचे नाते तुटले. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने सलमानच्या वागण्याला कंटाळून त्यांचे रिलेशन तोडले असल्याचे सांगितले होते.

ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉयशी जोडण्यात आले होते. विवेकचे ऐश्वर्यावर प्रचंड प्रेम होते. त्याने ऐश्वर्याच्या ३०व्या वाढदिवसा निमित्त तिला ३० भेटवस्तू दिल्या होत्या. परंतु त्यांचे रिलेशन फार काळ टिकले नाही. त्यानंतर विवेकने बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला. कर्नाटकचे माजी मंत्री स्वर्गीय जीवराज अल्वा यांच्या मुलीशी विवेकने २०१०मध्ये लग्न केले.

नुकताच विवेकचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आला होता. विवेकचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. तसेच विवेकने ‘काल’, ‘मस्ती’, ‘प्रिन्स’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 3:35 pm

Web Title: vivek oberoi gave special gifts to aishwarya roy avb 95
Next Stories
1 सलील कुलकर्णी घेऊन येणार आणखी एक नवा चित्रपट, पाहा पहिलं पोस्टर
2 अंघोळ करणाऱ्या उंदराच्या प्रेमात पडला अर्शद वारसी
3 …तर जितेंद्रसोबत झालं असतं हेमा मालिनी यांचं लग्न
Just Now!
X