News Flash

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या सक्सेस पार्टीमुळे विवेक झाला ट्रोल

चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फक्त २३ कोटींचा व्यावसाय केला आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमुळे अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. गेल्या महिन्यात विवेक ओबेरॉय अभिनेता ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

ऐन लोकसभा निवडणुकीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चित्रपट चर्चेत आला होता. वादानंतर चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित झाला होता. गुरूवारी रात्री अभिनेता विवेक ओबेरॉय चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. मात्र, सोशल मीडियावर नेटीझन्सनी फ्लॉप चित्रपटाची सक्सेस पार्टी म्हणून विवेकला ट्रोल केलं.

सक्सेस पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी विवेकसह चित्रपटाच्या सर्व युनिटला ट्रोल केलं आहे. ट्रोल करणाऱ्यांपैकी अनेकांनी असे म्हटले की, ‘चित्रपट तिकिटबारीवर आपटला असताना सक्सेस पार्टी कशासाठी केली आहे. ‘ अन्य एका नेटीझन्सने असेही म्हटले आहे की, ‘ मी पहिल्यांदाच पाहतोय की चित्रपट फ्लॉप झाल्याची पार्टी केली जातेय. ‘

दरम्यान, पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फक्त २३ कोटींचा व्यावसाय केला आहे. विवेकनं या चित्रपटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका केली होती. चित्रपटाच्या यशानंतर विवेक आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.त्यावरूनही नेटीझन्सनी विवेकला ट्रोल केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 7:22 pm

Web Title: vivek oberoi got troll for celebrating success of his film pm narendra modi nck 90
Next Stories
1 ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर अक्षय पुन्हा एकदा थिरकणार
2 Bigg Boss Marathi 2 : घरातील सदस्य देणार पाणी वाचविण्याचा संदेश
3 …म्हणून या सात कलाकारांनी नाकारला होता ‘बॉर्डर’
Just Now!
X