25 November 2020

News Flash

विवेक ओबेरॉयच्या चित्रपटातून ही स्टारकिड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स पदार्पण करताना दिसत आहे. आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या आगमी चित्रपटातून आणखी एक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे. ही स्टारकिड म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आहे.

नुकताच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विट करत त्याच्या आगमी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. ‘ही माझी मिस्ट्री गर्ल. आम्हाला पलक तिवारीला रोझी या रोलमध्ये लाँच करताना आनंद होत आहे. आमचा हा हॉरर थ्रिलर फ्रेंचायजीमधील चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

या चित्रपटाचे नाव ‘रोझी: द सफरॉन चॅप्टर’ असे असून चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा करत आहेत. तसेच चित्रपटाची निर्मिती विवेक ओबेरॉय करत आहे. या चित्रपटात पलक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये पलक अतिशय वेगळ्या अंदाजात दिसत आहे. पलकला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:17 pm

Web Title: vivek oberoi is going to launch shweta tiwari daughter palak tiwar avb 95
Next Stories
1 Video: कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदचे अश्रू अनावर, पाहा नेमकं काय झालं
2 ‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड’मध्ये ‘एक होतं पाणी’ला सात नामांकने
3 Video : ‘क्यूँ की तुम मेरी बेटी हो’; देशातील मुलींसाठी विद्या बालनची हृदयस्पर्शी कविता
Just Now!
X