05 March 2021

News Flash

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा

पोलीस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याचा तपास करत आहेत

विवेक ओबेरॉय, आदित्य अल्वा

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी बंगळूरु पोलिसांनी छापा टाकला आहे. दुपारी एक वाजता बंगळूरु पोलीस विवेकच्या घरी पोहोचले आणि त्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पोलीस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याचा तपास करत आहेत. तो बंगळूरुतील ड्रग्ज कनेक्शनमध्ये आरोपी आहे.

टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा याचा अमली पदार्थ प्रकरणात बंगळुरू पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विवेक ओबेरॉय हा आदित्य अल्वाचा नातेवाईक आहे. ‘आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असावा अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरात धडक दिली’, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

कन्नड चित्रपट निर्माते इंद्रजीत लंकेश याने काही महिन्यांपूर्वी कन्नड सिनेसृष्टीतील ड्रग्ज रॅकेटबाबत गौप्यस्फोट केला होता. माध्यमांमधील वृत्तांनुसार आदित्य अल्वासह मुख्य आरोपी शिवप्रकाश आणि शेख फाझील हे फरार झाले आहेत. कन्नड सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाचे रॅकेट समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली होती.

काय आहे प्रकरण?

कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रांचने (सीसीबी) एका व्यक्तीला चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नावं समोर आली. सुरुवातीला अभिनेत्री रागिनी द्विवेदीचा मित्र रवीशंकरला अटक करण्यात आली. रवीशंकरने चौकशीदरम्यान रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर रागिनीच्याही घरी छापे टाकत तिला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी नावं समोर आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 3:14 pm

Web Title: vivek oberoi mumbai house searched by police as they look for his brother in law aditya alva avb 95
Next Stories
1 ‘डान्सिंग क्वीन’च्या मंचावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे कलाकार
2 “मला अनफॉलो करा पण सलमानवर टीका करु नका”; अभिनेत्रीची देशवासीयांना विनंती
3 “त्या दिवशी अनुरागने ड्रग्ज घेतले होते”; पायल घोषचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल…
Just Now!
X