बॉलिवूडमध्ये २०१९ मध्ये दोन मोठ्या राजकीय नेत्यांवर आधारित बायोपिक येत आहेत. यातला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट आधीच वादात सापडला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटदेखील पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या सर्व बायोपिकमध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबोरॉय हा मोदींच्या तरुणपणीच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा आहेत.

अद्यापही या चर्चांना अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार विवेकच्या नावावर जवळजवळ शिक्कामोहर्तब करण्यात आलं आहे. या चित्रपटात परेश रावल हे देखील मोदींच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी साधलेल्या संवादात त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता. पुढच्या वर्षी सप्टेंबरपासून चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचीही माहितीही समजत आहे. सध्या चित्रपटाच्या संहितेवर काम सुरू आहे.

उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा शिवधनुष्य पेलणार आहे. यापूर्वी उमंग यांनी मेरी कोमच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलली होती.