News Flash

पुरणपोळी देणार ना? विवेक ओबेरॉयच्या अमृता सिंहला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

आज अमृता सिंहचा वाढदिवस आहे.

पुरणपोळी देणार ना? विवेक ओबेरॉयच्या अमृता सिंहला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

१९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील चमेली की शादी’, ‘आयना’, ‘मर्द’, ‘राजू बन गया जंटलमन’ हे चित्रपट गाजले. आज ९ फेब्रुवारी रोजी अमृताचा वाढदिवस आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण अभिनेता विवेक ओबेरॉयने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विवेकने अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने ‘शूट आऊट अ‍ॅट लोखंडवाला’ चित्रपटातील एक सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटात अमृता सिंहने विवेकच्या आईची भूमिका साकारली होती. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘अतिशय सुंदर अभिनेत्रीला आणि ऑनस्क्रीन आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. (माझी पुरणपोळी कुठे आहे?)’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

अमृताने तिच्यापेक्षा बारा वर्ष वयाने लहान असलेल्या सैफ अली खानशी १९९१ मध्ये लग्न केले होते. परंतु, त्यांचा तेरा वर्षांचा संसार मोडला आणि २००४ साली दोघे विभक्त झाले. १९९३ साली तिला कन्यारत्न प्राप्त झाले, तर २००१ साली मुलाचा जन्म झाला. अभिनेत्री सारा अली खान ही सैफ आणि अमृताची मुलगी सध्या बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2021 4:25 pm

Web Title: vivek oberoi wishesh anurta singh avb 95
Next Stories
1 लगीनघाई! हर्षदा खानविलकरने थाटात केलं आस्ताद-स्वप्नालीचं केळवण
2 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कानभट’चा दबदबा
3 आमिर खानची मुलगी इराने बॉयफ्रेंडसोबतचा शेअर केला फोटो, म्हणाली…
Just Now!
X