24 October 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरणात विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राइम ब्रांचची नोटीस

ड्रग्ज प्रकरण: विवेक ऑबेरॉयचा मेहुणा फरार

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरूमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत संजना गलरानी, रागिनी द्विवेदी, रवीशंकर अशा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांची नाव समोर आली आहेत. हे प्रकरण आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरापर्यंत पोहोचलं आहे. अलिकडेच विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याला पोलिसांनी नोटीस बजावला होती. त्यानंतर आता विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

अवश्य पाहा – अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

पोलिसांच्या नोटिसवर आदित्यने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवाय तो चौकशीसाठी देखील हजर राहिला नाही. त्यानंतर क्राईम ब्रांचने विवेकच्या मुंबईतील घरात छापा टाकला. अन् आता एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका अल्वा हिला देखील नोटीस बजावली आहे. प्रियंका आणि आदित्य दोघं बहिण-भाऊ आहेत. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणात तिचाही हात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आता प्रियंका अल्वाची देखील चौकशी केली जाणार आहे.

अवश्य पाहा – निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

हे प्रकरण काय आहे?

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरूमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली. या डायरीत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं होती. यापैकी एक नाव प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिचं देखील होतं. त्यानंतर पोलिसांनी राघिनीची चौकशी केली. या चौकशीत त्या १५ सेलिब्रिटींव्यतिरिक्त आता अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 2:32 pm

Web Title: vivek oberois wife priyanka alva city crime branch notice sandalwood drug case mppg 94
Next Stories
1 नव्या चित्रपटाची घोषणा करत कंगनाने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा, म्हणाली…
2 अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी
3 निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
Just Now!
X