News Flash

करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर अनुषा म्हणाली, “… त्यानेच मला उद्धवस्त केलं”

मी आतून खचले नव्हते मात्र...

वीजे आणि अभिनेत्री असलेल्या अनुषा दांडेकरने करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपबद्दल पुन्हा एकदा खुलासा केला आहे. ब्रेकअपमधून तीने स्वत:ला कशा प्रकारे सावरलं यावर ती व्यक्त झाली आहे. गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया देणं सुरुवातीला दोघांनी टाळलं. मात्र जानेवारीमध्ये अनुषाने ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं.

अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण कुंद्राने तिला फसवल्याचं म्हंटलं आहे. नुकतच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत संवाद साधला. या “आस्क मी एनी थिंग” सेशनमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिने ब्रेकअपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

यावेळी एका युजरने अनुषला विचारलं, “तू ब्रेकअपमधून स्वत:ला कसं सावरलंस .तू आतून खूप खचली असशील” यावर अनुषा म्हणाली, ” तुम्हाला माहितेय मी आतून खचले नव्हते मात्र मी एवढी वर्ष ज्याचा स्विकार केला त्याने मला निराश केलं, मला उद्धवस्त केल्याने मी हादरुन गेले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

पुढे ती म्हणाली, “जेव्हा मी यातून बाहेर पडले आणि मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझं स्वत:वरचं प्रेम आणि आत्मसन्मान गमावला आहे. मी स्वत:ला खूप त्रास करून घेतला जे चुकीचं होतं.” असं म्हणत अनुषाने भावनांना वाट मोकळी करून दिली.

आता कुणाच्या प्रेमात?
एका चाहत्याने अनुषाला तिच्या सध्याच्या रिलेशलशिपबद्दल प्रश्न विचारला. यावर अनुषा म्हणाली, ” आता तरी मी स्वत:वर प्रेम करतेय. पण एका अशा व्यक्तीच्या शोधात आहे जी माझ्यासोबत मनसोक्त हसेल, माझ्यासोबत प्रामाणिक राहिल आणि ज्याला एका खऱ्या महिलेचं भय नाही.” असं ती म्हणाली.

अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 2020 मध्ये मात्र त्यांचं ब्रेकअप झालं. तर अनुषा दांडेकरने 31 डिसेंबर 2020 ला सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत त्यांच्या ब्रेकअपचा खुलास केला होता. या तिने करणने तिला फसवल्याचं आणि खोटं बोलल्याचं सांगितलं होतं. करण तिची माफी मागेल अशी अनुषाला अपेक्षा होती. मात्र करणने माफी न मागितल्याने तिची निराशा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 11:36 am

Web Title: vj anusha dandekar opens up on brekup with karan kundra says he cheated kpw 89
Next Stories
1 अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन
2 ‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकूट हिसकावल्यामुळे परिक्षकाला अटक
3 बिग बॉसमधील अभिनेत्रीचा लग्नानंतर आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
Just Now!
X