News Flash

दिलदार अभिनेता! करिअरमधल्या पहिल्याच चित्रपटाच्या साइन केलेल्या रकमेतून केली मदत

नवोदित कलाकाराने केलेल्या मदतीचं कौतुक होत आहे.

करोनाची प्रादुर्भाव उद्भवल्यापासून अनेक कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले. काहींनी डॉक्टर्सना, नर्सेसना काहींना पोलिसांनी, काहींनी स्थलांतरित मजुरांना तर काहींनी गोरगरीबांना जमेल तशी मदत केली. अशातच एका नवोदित कलाकाराने केलेल्या मदतीचं कौतुक होत आहे. अभिनेता वृषभ शहा याने त्याच्या करिअरच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या साइनिंगची रक्कम मदतीसाठी दिली.

वृषभ लवकरच ‘शारदा प्रॉडक्शन’ निर्मित ‘मंगलाष्टक रिटर्न’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. साइन केलेल्या या चित्रपटाच्या रकमेतून त्याने स्वतःसाठी काहीही खर्च न करता पोलीस बांधवांना मदत केली आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच त्याची चर्चा होत आहे.

याबद्दल वृषभ म्हणाला, “करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस बांधव सर्वांचं रक्षण करत आहेत. त्यांचं काम ते काटेकोरपणे बजावत आहेत. या मदतकार्यात एक खारीचा वाटा म्हणून मी माझ्या ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाच्या साइन केलेल्या रकमेतून ही मदत केली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:34 pm

Web Title: vrushab shah helped police from the signing amount of his first film ssv 92
Next Stories
1 “होय गौरवर्णीय असल्याचा फायदा मिळाला”; वर्णद्वेषाच्या आरोपांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
2 ‘सूर्यवंशी’मधून करण जोहरचं नाव हटवलं?
3 सुशांतच्या Wikipedia पेजसंदर्भातही गूढ वाढलं; मृत्यूच्या बातमीआधीच…
Just Now!
X