‘मग्न तळ्याकाठी’चा शनिवारी शुभारंभ

एखादा चित्रपट गाजला की त्याचा ‘सिक्वेल’ काढण्याची पद्धत हिंदी आणि आता मराठी चित्रपटसृष्टीतही सुरू झाली आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई-२’ प्रदर्शित झाला. ‘टाईमपास’नंतर त्याचा सिक्वेल ‘टाईमपास-२’ म्हणून आला. सिक्वेलची ही परंपरा आता मराठी रंगभूमीवर सुरू होणार आहे. महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा पुढील भाग ‘मग्न तळ्याकाठी’ याच आठवडय़ात रंगभूमीवर सादर होणार आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
sukma ram mandir
छत्तीसगडमधील माओवाद्यांनी बंद केलेले राम मंदिर २१ वर्षांनी खुले
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक

काही वर्षांपूर्वी ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक रंगमंचावर सादर झाले होते. जिगिषा आणि अष्टविनायक या नाटय़संस्थांनी ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात रंगभूमीवर सादर केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात विविध ठिकाणी आणि राज्याबाहेरही काही ठिकाणी ‘वाडा चिरेबंदी’चे प्रयोग झाले.

महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून सादर झालेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकात एकत्र कुटुंब पद्धती, कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मुंबईहून गावी आलेला भाऊ आणि त्यानंतर घडणारे वादळ सादर करण्यात आले होते. सर्वसामान्य कुटुंबातील अनुभव वाटावा, असे नाटय़ नाटकात आहे. ‘मग्न तळ्याकाठी’ मध्ये मूळ नाटकातील (वाडा चिरेबंदी) सध्याची पिढय़ापिढय़ातील कौटुंबिक संघर्ष, नात्यांमध्ये काळानुरूप झालेला बदल यांचे वास्तव मांडण्यात आले आहे.

निवेदिता जोशी-सराफ, वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, नेहा जोशी, प्रतिमा जोशी, दीपक कदम, भारती पाटील यांच्यासह ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये राजश्री ठाकूर, सिद्धार्थ चांदेकर आणि चिन्मय मांडलेकर हे कलाकार आहेत. शनिवार, १४ मे रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे ‘मग्न तळ्याकाठी’चा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर हे नाटकाचे निर्माते आहेत. प्रदीप मुळ्ये (नेपथ्य), आनंद मोडक, राहुल रानडे (संगीत), रवी रसिक (प्रकाश योजना), संज्योत वैद्य व अर्जुन मुद्दा (सहनिर्माते) आदींनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.