30 November 2020

News Flash

Video : ‘वाघेऱ्या’ गावात वाघाने घातला धुमाकूळ

संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येते आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कल लढवल्या जातात.

१८ मे रोजी 'वाघेऱ्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘लांडगा आला रे आला’ ही गोष्ट लहानपणी सर्वांनीच ऐकली असेल. लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे, अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्याऐवजी गावात ‘वाघ’ आला तर काय गोंधळ उडेल? असाच काहीसा गोंधळ ‘वाघेऱ्या’ या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘बॉईज’ सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या ‘वाघेऱ्या’ या आगामी सिनेमाचे नुकतेच ट्रेलर आणि ‘उनाड पोरं’ या गाण्याचे प्रदर्शन झाले. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामध्ये ‘वाघे-या’ नावाच्या गावातील गमतीजमती प्रेक्षकांना दिसून येतात.

गावात ‘वाघ’ शिरल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. या बातमीमुळे संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येते आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कल लढवल्या जातात. शिवाय, या सगळ्या गोंधळामुळे स्वत:च्या लग्नाला उभा असलेल्या वनअधिका-यालासुद्धा ताबडतोब वाघेऱ्या गावात पाचारण करावे लागते, त्यामुळे त्याच्या मनाची झालेली घालमेल या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

ग्रामीण विनोदाचा वारू चौफेर उधळवणाऱ्या या ट्रेलरबरोबरच, सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील लिखित आणि संगीतकार मयुरेश केळकर दिग्दर्शित ‘उनाड पोरं’ हे उडत्या चालीचे गाणेदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आले. आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील हे गाणे सिनेरासिकांचे चांगलेच मनोरंजन करणारे ठरत आहे.

वाचा : बॉलिवूडचा सिंघम ‘या’ आजाराने त्रस्त

‘वाघे-या’ या सिनेमात ऋषिकेश जोशी, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे यांच्या मुख्य भूमिका असून, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठीतील दिग्गज कलाकारांच्या कसदार अभिनयाची जुगलबंदीदेखील यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘वाघे-या’ गावात खरंच वाघ आला होता का? की फक्त एक अफवा होती? हे १८ मे रोजी स्पष्ट होईल. १८ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 7:29 pm

Web Title: wagherya marathi movie trailer launch rishikesh joshi bharat ganeshpure kishor kadam
Next Stories
1 बॉलिवूडचा सिंघम ‘या’ आजाराने त्रस्त
2 आधी संन्यास, मग लग्न, आता घटस्फोट, सोफियानं पतीला काढलं घराबाहेर
3 ‘मिस हवाहवाई’च्या जीवनप्रवासासाठी ‘या’ तीन नावांना पसंती?
Just Now!
X