News Flash

‘वजह तुम हो’च्या अभिनेत्रीचे चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत डेटींग?

विशाल पांड्या दिग्दर्शित 'वजह तुम हो' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे.

विशाल पांड्या दिग्दर्शित ‘वजह तुम हो’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. चित्रपटातील बोल्ड दृश्ये आणि श्रवणीय गाण्यांमुळे अगोदरपासूनच चित्रपटरसिकांमध्ये या चित्रपटाविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खानचा दंगल हा बहुचर्चित चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असल्याने ‘वजह तुम हो’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी आमीरच्या चित्रपटाशी टक्कर घेण्याचे टाळत आपला चित्रपट २ डिसेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या कारणानेदेखील चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीच्या आशा वाढल्या आहेत. याशिवाय आणखी एका कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सना खान आणि दिग्दर्शक विशाल पांड्यामध्ये निर्माण झालेली जवळीक हे ते कारण आहे.

शुटिंगदरम्यान सना आणि विशालमध्ये खूप जवळीक निर्माण झाल्याचे समजते. आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे सांगत सना वारंवार याचे खंडन करत आली आहे. टाईम्स ऑफ इंडिया संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार सतत एकमेकांशी संपर्कात असणारे सना आणि विशाल फिरायलादेखील एकत्र जातात. एवढेच नव्हे तर सनाच्या वाढदिवशी विशालने तिला एक छानशी भेटदेखील दिली होती. असे असले तरी दोघेही या विषयी मोकळेपणाने बोलण्याचे टाळतात.

sana-khan-650

विशाल हा आपल्या जवळच्या खास माणसांपैकी एक असल्याचे सनाचे म्हणणे आहे. दोघे खूप गप्पिष्ट असून एकत्र फिरायला जात असल्याचेदेखील तिने सांगितले. असे असले तरी दोघांमध्ये तसले काही नसल्याचे ती म्हणाली. विशाल दिसायला अतिशय सुंदर असून स्त्रियांचा आदर राखणारा आहे. आम्ही केवळ मित्र असून, याच्यापलिकडे आमच्यात काहीही नसल्याचे सना म्हणते. काही व्यक्ती तुमच्यासाठी काही ना काही करून तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सनाला असे काही करण्याची गरज नाही. यासाठी केवळ तिचे स्मितहास्य पुरेसे असल्याचे विशालचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 3:11 pm

Web Title: wajah tum ho star sana khan dating her director vishal pandya
Next Stories
1 आलियाला झाली होती वर्ग साफ करण्याची शिक्षा
2 रणबीरचे शाळेतील खोडकर रुप सर्वांसमोर उघड
3 ..म्हणून आलिया म्हणाली ‘जस्ट गो टू हेल’
Just Now!
X