News Flash

वाजिद खान यांचा रुग्णालयातील ‘तो’ व्हिडीओ शेवटचा ठरला

वाजिद यांनी रुग्णालयातून भाऊ साजिदसाठी गायलं होतं गाणं, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकारांच्या साजिद-वाजिद या जोडीमधील एका जोडीदाराने सोमवारी जगाचा निरोप घेतला. वाजिद खान यांचं सकाळी मुंबईमधील रुग्णालयात निधन झालं. ह्दय बंद पडल्याने वाजिद खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती संगीतकार आणि भाऊ साजिद खानने दिली आहे. वाजिद खान यांना करोनाची लागण झाली होती, तसंच किडनीसंबंधीही त्रास होता अशी माहिती साजिद यांनी दिली आहे. वाजिद खान यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला असून अनेक सेलिब्रेटींनी आपण भावूक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान सोशल मीडियावर वाजिद खान यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या गाण्यात वाजिद खान रुग्णालयात बेडवर बसलेले दिसत आहेत. आपण हे गाणं आपला भाऊ साजिदसाठी समर्पित करत असल्याचं ते सुरुवातीला सांगताना ऐकू येत आहे. यावेळी वाजिद खान सुपरहिट ‘दबंग’ चित्रपटातील गाणं गातात. त्यांचं हे गाणं रुग्णालयातील इतर रुग्णदेखील ऐकून आनंद लुटत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण दुर्दैवाने रुग्णालयातील हा व्हिडीओ वाजिद खान यांचा शेवटचा व्हिडीओ ठरला.

साजिद-वाजिद या जोडीने सलमान खान आणि काजोल यांच्या १९९८ मधील ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. करिअरमधील अनेक चित्रपट त्यांनी सलमानसोबतच केले. ‘गर्व’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘पार्टनर’, ‘वीर’ आणि ‘दबंग’ या चित्रपटांना साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्द केलं. वाजिद यांनी अक्षय कुमारच्या रावडी राठोड चित्रपटालाही संगीत दिलं होतं. यामधील ‘चिंता ता ता चिंता’ हे गाणं त्यांनी गायलं होतं. याशिवाय ‘सारेगमपा” या रिअॅलिटी शोमध्ये साजिद-वाजिद जोडी झळकली होती. तसंच आयपीएल ४ चं थीम साँगही त्यांनीच तयार केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 2:59 pm

Web Title: wajid khan dedicates dabang song in last video for brother sajid khan sgy 87
Next Stories
1 “बस दुआओं में याद रखना”; वाजिद खान यांचा शेवटचा फोन कॉल व्हायरल
2 …म्हणून सुनील दत्त यांना मिळाली होती अंडरवर्ल्ड डॉनकडून धमकी
3 धारावीसाठी अजय देवगणने केली मोठी मदत
Just Now!
X