बॉलिवूडमधील दिवंगत संगीत दिग्दर्शक आणि गायक वाजिद खानची पत्नी कमालरुख खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने दिर साजिद खान आणि सासू यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. खान कुटुंबीयांनी संपत्तीतून तिला वगळल्याचा आरोप तिने केला आहे. गेल्या ६ वर्षांपासून कमालरुख ही कुटुंबीयांपासून वेगळी राहते आणि तिने यापूर्वी तिच्या सासऱ्यांवर देखील अनेक आरोप केले होते. वाजिद खानच्या निधनापूर्वी कमालरुखने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा घटस्फोट होऊ शकला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर साजिद खान आणि त्यांची आई यांच्या एकूण संपत्तीचा तपशील घेण्यात आला. त्यानंतर १६ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीमध्ये वाजिद खान काही प्रसिद्ध आर्टिस्टच्या पेंटिगचा मालक असल्याचे समोर आले. या पेंटिंगची किंमत जवळपास ८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. या पेंटिंगमध्ये एफएफ हुसैन यांचे पेंटिंग आणि स्केच आहेत. त्याच बरोबर तैय्यब मेहता, वीएस गायतोंडे, एसएच रजा यांचे एक एक पेंटिग आणि स्वामीनाथ यांचे दोन पेंटिंग आहेत.

हेही वाचा : Indian Idol, सोनू निगमचा अमित कुमार यांना पाठिंबा, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, कमालरुख यांचे वकील बहरैज ईराणी यांना पेंटिंगशी तिचे काही भावनिक नाते आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘कुटुंबीयांसाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांना आर्थिक आणि भावनिक महत्व आहे. आज कमालरुख विधवा आहे आणि या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. इतकच नव्हे तर वाजिद त्याच्या मुलीला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवू इच्छित होता. पण अचानक त्याचे निधन झाल्यामुळे कुटुंबीय पाठिंबा देत नाहीत. या पैशांनी कमालरुख यांना मदत होईल.’

ईराणी यांच्या मते, ‘पती-पत्नीमध्ये झालेल्या घटस्फोटानंतर पालक मुलांना कसे घटस्फोट देऊ शकतात? मुलांच्या अधिकारावर त्याचा परिणाम होत नाही. वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार असतो.’