News Flash

आलिया, अनुष्काचे डिझायनर कपडे हवे आहेत का, तर मग हे कराच

'पर्सनल वॉर्डरोब ऑक्शन' या मोहिमेत सहभागी झालेल्या आलिया भट्टने चाहत्यांना ही संधी दिली आहे

आलिया भट्ट

सुंदर आणि लक्षवेधी अशा डिझायनर कपड्यांवर अनेकांचाच डोळा असतो. एखाद्या चित्रपटात किंवा कार्यक्रमात आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला डिझायनर कपड्यांमध्ये पाहिल्यानंतर अनेकजण त्या ठिकाणी स्वत:ला पाहू लागतात. अर्थात या सर्व घडामोडी कल्पनाविश्वात घडत असतात. पण, आता या कल्पनाविश्वाला सत्याची झालर लागणार आहे. कारण, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यांचे काही लोकप्रिय डिझायनर कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट होऊ शकतात.

‘पर्सनल वॉर्डरोब ऑक्शन’ या मोहिमेत सहभागी झालेल्या आलिया भट्टने चाहत्यांना ही संधी दिली आहे. एका पत्रकाद्वारे तिने याविषयीची घोषणा दिली. ‘मी वॉर्डरोब इज सू वॉर्डरोब’, या अनोख्या उपक्रमासाठी मी स्वत: खूप उत्सुक असल्याचं तिने या पत्रकातून म्हटलं आहे. आलिया किंवा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींच्या वॉर्डरोबमधील हे कपडे वापरण्यासोबतच ते विकत घेणाऱ्यांना काही समाजोपयोगी कामांनाही हातभार लावता येणार आहे. कारण, लिलावातून येणारे पैसे हे सामाजिक कामांसाठी काही धर्मदाय संस्थांना देण्यात येणार आहेत.

फक्त आलियाच नव्हे, अनुष्का शर्मा आणि हृतिक रोशन यांनीही वापरलेले कपडे म्हणजेच ‘ऐ दिल है मुश्किल’मधील अनुष्काने वापरलेला कुर्ता आणि ‘क्रिश’ या चित्रपटामध्ये हृतिकने वापरलेला सुपरहिरोचा जॅकेटही लिलावात विकण्यासाठी काढण्यात आला आहे. या लिलावात हृतिकच्या जॅकटला ७०,००० रुपयांची बोली लावण्यात आली असून, अनुष्काच्या कुर्त्याला १८,५०० रुपये इतकी किंमत देण्यात येत आहे.

३ जूनपर्यंत हा लिलाव सुरु राहणार असून ,आता दर दिवसाआड या सेलिब्रिटींच्या डिझायनर कपड्यांची किंमत वाढत जाणार यात शंका नाही. saltscout.com या वेबसाइटवरुन हा लिलाव सुरु आहे. ही तिच वेबसाईट आहे ज्यावरुन काही दिवसांपूर्वी खिलाडी कुमारने ‘रुस्तम’ या चित्रपटात वापरलेला नौदल अधिकाऱ्याचा गणवेशरुपी पोषाख लिलावासाठी काढण्यात आला होता. ज्यामुळे बरेच वादही रंगल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 6:33 pm

Web Title: want to buy alia bhatt anushka sharma clothes this is what you need to do
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे रिसेप्शनमध्ये आनंदने घातले स्पोर्ट्स शूज
2 माधुरीला का वाटते नाटकात काम करण्याची भीती?
3 Royal wedding : मुलीच्या लग्नात वडिलच राहणार अनुपस्थित
Just Now!
X