अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या श्रीदेवी यांचे बरेच चित्रपट आजही अनेकांना आवडतात. त्यांनी साकारलेल्या भूमिका, चेहऱ्यावरील हावभाव, नृत्य या सर्व गोष्टी वारंवार पाहाव्याशा वाटतात. याच कारणामुळे जगभरात त्यांचे चाहते आहेत. आज जागतिक महिला दिनाचं निमित्त साधत त्यांच्या याच अजरामर भूमिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणले जात आहेत.

बॉलिवूडच्या ‘चांदनी’चे काही गाजलेले चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखवले जाणार आहेत. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार पीव्हीआर यासाठी पुढाकार घेत असून ‘चांदनी’, ‘चालबाज’, ‘लम्हे’ आणि त्यांचे अखेरचे दोन चित्रपट ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘मॉम’ हे पीव्हीआर थिएटरमध्ये पुन्हा एकदा पाहता येणार आहेत.

Women’s day 2018 : येई कवेत आकाश..

‘श्रीदेवीची उल्लेखनीय कामगिरी पुन्हा एकदा अशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीला आणली जात असल्यास तिला याहून उत्तम आदरांजली काय असू शकेल? तिच्या चाहत्यांसाठीही ही पर्वणीच असेल,’ अशी प्रतिक्रिया श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी दिली.

वाचा : ‘त्या’ चाहतीने सर्व संपत्ती केली संजय दत्तच्या नावे 

श्रीदेवी यांची अकाली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. दुबईत पुतण्याच्या लग्नानिमित्त गेल्या असता हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून त्यांचा २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले.