News Flash

#WarTrailor : हृतिक-टायगरची खडाजंगी; हॉलिवूडला टक्कर देणारे जबरदस्त अॅक्शन सीन्स

जगातील दोन बड्या अॅक्शन कोरिओग्राफर्सनी या चित्रपटातील अॅक्शन सीन्सची कोरिओग्राफी केली आहे.

जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून डान्स याचं उत्तम समीकरण अभिनेता हृतिक रोशन व टायगर श्रॉफ यांच्यामध्ये पाहायला मिळतं. हे दोन अभिनेते जेव्हा ऑनस्क्रीन एकत्र येतात तेव्हा एक वेगळीच जादू पाहायला मिळते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून याच जादूची अनुभूती होते. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स यामध्ये पाहायला मिळतात. या साहसदृश्यांना योग्य न्याय देण्यासाठी हृतिक व टायगर असे दोन तगडे कलाकार ‘यशराज फिल्म्स’ने निवडले आहेत.

हृतिक आणि टायगर यांच्यामधील खडाजंगी मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच असेल. जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये गुरू-शिष्याचं नातं अधोरेखित करत हृतिक-टायगमधील टक्कर दाखवण्यात आली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री वाणी कपूरसुद्धा या ट्रेलरमध्ये झळकते. मात्र तिची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही.

सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे. या चित्रपटाविषयी सिद्धार्थ म्हणाला, ”भारतातील सर्वोत्तम अॅक्शनपट आम्हाला प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. आतापर्यंत जगाने पाहिले नसतील असे जबरदस्त अॅक्शन सीन दाखवले जावे यासाठी पहिल्यांदा आम्ही जगातील दोन बड्या अॅक्शन कोरिओग्राफरना एकत्र आणलं आहे.”

श्री ओह व अँडी आर आर्मस्ट्राँग या दोघांनी ‘वॉर’साठी अॅक्शन कोरिओग्राफी केली आहे. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:13 pm

Web Title: war trailer out hrithik roshan challenges tiger shroff to kill him in epic action film ssv 92
Next Stories
1 बाहुबली फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?
2 ”दिग्दर्शक वारंवार हॉटेलमध्ये बोलवत होता,” विद्या बालनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
3 रानू मंडल यांना हिमेशने दिलेल्या मानधनाची रक्कम ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
Just Now!
X