02 March 2021

News Flash

‘वंडर वुमन’ला प्रतिक्षा चमत्काराची; तीन महिन्यात चार वेळा ओढावली ही नामुष्की

वर्षातील सर्वात मोठा चित्रपट करोनामुळे संकटात

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. लोक आपल्या घरातच कैद झाले आहेत. लॉकडाउनमुळे सिनेउद्योग तर पार ठप्पच झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे ‘वंडर वुमन १९८४’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

‘वंडर वुमन’ हा सुपरहिरोपट येत्या २ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यात चार वेळा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. सुरुवातीला हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे ही तारीख पुढे ढकलून पाच जून करण्यात आली. करोनामुळे पाच जूनला चित्रपट प्रदर्शित करणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून १४ ऑगस्ट करण्यात आली. आता ही तारीख देखील पुढे ढकलून २ ऑक्टोंबर करण्यात आली आहे. निर्मात्यांना हा चित्रपट सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित करायचा आहे. त्यामुळे चित्रपटाची तारीख सतत पुढे ढकलली जात आहे.

‘वंडर वुमन १९८४’ हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘वंडर वुमन’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री गल गडॉट हिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या जबरदस्त अ‍ॅक्शन आणि अफलातून अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘वंडर वुमन’चा दुसरा भाग तयार करण्यात आला. मात्र करोना विषाणूच्या प्रभावामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 3:54 pm

Web Title: warner bros announces new release dates for wonder woman 1984 mppg 94
Next Stories
1 एवढं सारं मिळवल्यावर आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो कुठून?; बिग बी झाले भावूक
2 “असं काय आहे ज्यासाठी जीव देऊ शकतो, हे मला समजून घ्यायचं होतं”; सुशांत सिंगची ‘ती’ मुलाखत चर्चेत
3 ग्रामीण राजकारणावर भाष्य करणारा सिनेमा ‘खुर्ची’
Just Now!
X