‘मै मोहम्मद रफी तो नही बन सका पर तेरे को लता मंगेशकर जरूर बनाऊंगा’ असं म्हणणारा ‘फन्ने खान’ ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ९० च्या दशकातील एका बँडमध्ये गायक असणारा फन्ने यशस्वी होण्याची स्वप्न पाहत असतो. मात्र नियतीला ते मंजूर नसतं. झगमगत्या दुनियेच्या गर्दीत फन्ने खान गायकाचा टॅक्सी चालक होतो. मात्र आपलं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खदखद सारखी त्याच्या मनात असते. हे स्वप्न आपली मुलगी पूर्ण करेल अशी अपेक्षा फन्ने करतो. मात्र मुलीच्या सुरेल आवाजापेक्षा तिच्या लठ्ठपणाकडे लोकांचं अधिक लक्ष जातं. या मुलीला यशस्वी गायिका बनवण्यासाठी सुरू असलेली एका वडिलांची धडपड फन्ने खानमध्ये पाहायला मिळणार आहे.
अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर फन्ने खानच्या भूमिकेत दाखवला आहे. अनिल कपूरबरोबरच ऐश्वर्या राय बच्चन, राजकुमार राव, दिव्या दत्ता हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. ऐश्वर्यानं या चित्रपटात गायिकेची भूमिका साकारली आहे. ‘फन्ने खान’ चित्रपटाच्या निमित्तानं ऐश्वर्या आणि अनिल कपूर ही जोडी अठरा वर्षांनी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या आणि अनिल कपूर यांनी ‘ताल’, ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात काम केलं आहे. योगायोग म्हणजे ‘ताल’ चित्रपटातदेखील ऐश्वर्यानं गायिकेची भूमिका साकारली होती.
Ek hai raaz aur dusra hai #FanneyKhan ka andaaz! Honge iske sapne poore?
https://t.co/SzaoQRXrpn #FanneyKhanTrailer #AishwaryaRai @RajkummarRao @divyadutta25 @TSeries @fanneykhanfilm @ROMPPictures @AtulManjrekar #VirenderArora #NishantPitti— Anil Kapoor (@AnilKapoor) July 6, 2018
चित्रपटात ऐश्वर्या- अनिल, राजकुमार हे जरी मुख्य भूमिकेत असले तरी ट्रेलरमध्ये पिहू संद आणि अनिल हे दोघंही प्रेक्षकांचं सर्वाधिक लक्ष वेधतात. ७३व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवलेल्या ‘एव्हरीबडीज फेमस’ या बेल्जियन चित्रपटाचा फन्ने खान रिमेक आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकरनं केलं आहे. ३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 3:39 pm