27 September 2020

News Flash

पाहा आलिया भट्टचा लघुपटः अज्ञात पुरुषांसोबत महिला सुरक्षित आहेत का?

'गोइंग होम' या पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हे जग खरचं महिलांसाठी सुरक्षित आहे का? याबाबत चित्रीकरण करण्यात आले आहे.

| October 21, 2014 12:26 pm

‘क्वीन’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडणा-या दिग्दर्शक विकास बहलने आलिया भट्टसह एक लघुपट तयार केला आहे. या लघुपटाचे नाव ‘गोइंग होम’ असे आहे. हा व्हिडिओ वायरल झाला असून, सध्या सर्वत्र सोशल मिडियावर फिरत आहे.
‘गोइंग होम’ या पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हे जग खरचं महिलांसाठी सुरक्षित आहे का? यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. व्हिडिओत आलिया भट्ट ही एकटीच रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावरून गाडी चालविताना दिसते. त्यानंतर तिच्या आईचा फोन येतो. त्यावर “मी १० मिनिटात घरी पोहचेन”, असे ती आईला म्हणते. पण, गाडी मध्येच बंद पडल्याने ती मध्येच वाटेत अडकते. गाडीत एकट्या मुलीला पाहून एक गाडी थांबते. त्यात पाच मुले असतात. आलिया त्यांच्याकडून मदत मागते. मदतीच्या नावाखाली ही पाच मुले आलियासोबत काय करतात? आलिया त्यांच्यासोबत सुरक्षित राहते का? की ती लैँगिक अत्याचाराला बळी पडते? हे या व्हिडिओत पाहावयास मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2014 12:26 pm

Web Title: watch alia bhatts short film are women safe around unknown men
टॅग Bollywood
Next Stories
1 दिवाळी विशेषः सारसबागेतील लाख दिव्यांचे आकर्षण…
2 बिग बॉस ८ : दिवाळीच्या तोंडावर मिठाई बनविण्याचे कार्य
3 श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’मधून दिग्दर्शक होण्याची प्रेरणा मिळाली- इम्तियाझ अली
Just Now!
X