छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित शेट्टी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे बाबा झाल्याची माहिती दिली होती. आता अनिता आणि रोहित मुलगा आरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. दरम्यान अनिताचा आरवसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलाच्या कानात गायत्री मंत्र गुणगुणताना दिसते.
व्हिडीओमध्ये अनिताने आरवला उचलून घेतले आहे. ती त्याच्या कानाच्या जवळजाऊन गायत्री मंत्र म्हणते आणि आरव कॉमेरेकडे पाहून खेळताना दिसतो. अनिता आणि आरवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
View this post on Instagram
आरवचा जन्म ९ फेब्रुवारी रोजी झाला. रोहित रेड्डीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर करत बाबा झाल्याचे सांगितले होते. एका फोटोमध्ये अनिता तर दुसऱ्या फोटोमध्ये फोनच्या स्क्रीनवर बाळाचा चेहरा दिसत होता. टीव्ही क्वीन एकता कपूर आरवला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. अनिता आणि रोहितने त्यांच्या बाळाचे इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आहे. या अकाऊंटवर आरवचे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.
अनिताने ‘नागिन ४’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए ९’मध्ये त्या दोघांनी भूमिका साकारली होती. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 7, 2021 10:29 am