सध्या सोशल मीडियावर केवळ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचीच जादू पसरल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही प्रेम व्यक्त करताना कचरत नाहीत. इंग्लंडविरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने गळ्यातील आंगठी काढत त्याचे चुंबन घेत अनुष्काबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.

सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं दमदार शतकी खेळी करत भारतीय संघाला सावरले. विराट कोहलीने १४९ धावांची खेळी करत भारताला पहिल्या डावामध्ये समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोचवले. विराट कोहलीचे हे २२ वे शतक होते. शतकानंतर विराट कोहलीने गळ्यातील आंगठीचे चुंबन घेत अनुष्काबद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले. यावेळी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनेही विराटच्या या प्रेमाला दाद दिली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने आंगठीचे चुंबन घेत प्रेम व्यक्त केल्यानंतर कॅमेरा अनुष्का शर्माकडे गेला. त्यावेळी अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी समालोचन करत असलेल्या नेहराने वाईफ हॅप्पी तर लाईफ हॅप्पी असे म्हणत विराट कोहलीची फिरकी घेतली.