अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखला जातो. विविध चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका आणि प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला रणवीर वेळोवेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन नजराणा सादर करण्याच्या प्रयत्नात असतो. सध्याही तो अशाच एका भूमिकेच्या तयारीला लागला असून त्यासाठी तो विविध कार्यशाळा आणि त्या क्षेत्रातील जाणकारांची मदत घेत असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘पद्मावती’ चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा हा बिट्टू शर्मा आता लवकरच झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी त्याने तयारी सुरु केली असून, त्याच निमित्ताने त्याने नुकतीच माहीम येथील एका कार्यशाळेला हजेरी लावली.

यावेळी त्याने शब्दांची जुळवाजुळव करुन एक वेगळीच चाल लावून ते सादर करणाऱ्या खऱ्याखुऱ्या स्थानिक रॅपर्सशी संवाद साधला. त्या रॅपर्ससोबत रणवीरने फक्त गप्पाच मारल्या नाहीत तर, त्यांच्यासोबत आपलेही रॅपचे कौशल्य सर्वांना दाखवून दिले. रणवीर खूप चांगले रॅप करतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यातही मुंबईच्या काही स्थानिक कलाकारांची साथ लाभल्यामुळे त्याने पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात रॅप सादर केल्याचे पाहायला मिळाले.

वाचा : अनुष्कासाठी तीन महिने शोधत होता अंगठी

https://www.instagram.com/p/BcnSONxF_qK/

https://www.instagram.com/p/Bco0lwLlhAd/

https://www.instagram.com/p/BcncTdbFUKf/

https://www.instagram.com/p/BcnSy5wFaEv/

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. रणवीर सिंगशिवाय अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/BcnSSYcF_Qm/