अविश्वसनीय अशा शौर्यगाथेची कथा ‘केसरी’च्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत ‘केसरी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘आज मेरी पगड़ी केसरी, जो बहेगा वो मेरा लहू भी केसरी औरे मेरा जवाब भी केसरी’ असं म्हणणाऱ्या २१ शूरवीरांची कथा ‘केसरी’त दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार परिणीती- चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. १० हजार सैन्याच्या रुपानं मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी शेवटच्या श्वसांपर्यंत लढा देत आपलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केलं. या शौर्यगाथेची झलक ‘केसरी’ च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.
अंगावर रोमांच आणणाऱ्या या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. २१ मार्च रोजी ‘केसरी’ प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटापैकी ‘केसरी’ एक आहे. या चित्रपटासाठी अक्षयनं खूपच मेहनत घेतली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 11:40 am