22 October 2020

News Flash

Gold Movie Teaser : अन् त्यांच्या प्रयत्नाने ब्रिटीशही भारतीय राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहू लागले

ज्या ब्रिटीशांनी आपल्यावर इतकी वर्षे राज्य केलं त्यांच्या राष्ट्रगीतासाठी आपण नेहमीच उभे राहिलो, याबद्द तुम्हाला काय वाटतं?

'गोल्ड'

Gold Movie Teaser. अभिनेता सलमान खानच्या ‘रेस ३’ या चित्रपटाची चर्चा सुरु असताना बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या प्रसंगावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमधून खिलाडी कुमारची देशप्रेमी बाजू आपल्याला पाहायला मिळते. कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा, अशा ओळींनी या टीझरला सुरुवात होते. पण, त्यानंतर सुरुवात होते ती ब्रिटीश राष्ट्रगीताला.

‘गॉड सेव्ह द क्वीन….’ हे राष्ट्रगीत वाजू लागतं आणि समोर युनियन जॅक फडकू लागतो. ज्या ब्रिटीशांनी आपल्यावर इतकी वर्षे राज्य केलं त्यांच्या राष्ट्रगीतासाठी आपण नेहमीच उभे राहिलो, याबद्द तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न या टीझरमधून विचारण्यात येतो आणि क्षणार्धासाठी आपल्याला नेमकं काय वाटतं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीचा खटाटोप सुरु होते. तितक्यातच एका विरामानंतर कोटच्या आतल्या खिशातून भारताचा राष्ट्रीय ध्वज बाहेर काढणारा, चेहऱ्यावर अव्यक्त भाव असणारा अक्षय कुमार आपल्या भेटीला येतो आणि ‘गोल्ड’मध्ये नेमकं काय पाहता येईल याची पुसटशी कल्पना देऊन जातो.

अवघ्या एका मिनिटाच्या या टीझरमधून एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या स्वप्नाविषयी सर्वांनाच कल्पना येते. ज्या व्यक्तीमुळे ब्रिटीशही मोठ्या आदराने भारतीय राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहू लागले होते. खेळाच्या पार्श्वभूमीवर देशप्रेमाची किनार असणारं कथानक ‘गोल्ड’ या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. चित्रपटाचा पहिला टीझर पाहून याचा सहज अंदाज लावता येतो.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

रीमा कागती दिग्दर्शित या चित्रपटातून १९४८ चा काळ साकारण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तेव्हा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 8:41 am

Web Title: watch gold movie teaser bollywood actor akshay kumar hockey coach sports film
Next Stories
1 ‘थोडा रहम कर लो’, ‘रेस ३’ पाहिल्यावर सोशल मीडियावर हास्यकल्लोळ
2 Big Boss Marathi: कोण होणार नवा कॅप्टन
3 जाणून घ्या प्रियांकाला भेटल्यानंतर काय म्हणाला निकचा भाऊ
Just Now!
X