News Flash

VIDEO: कियाराचं नाव घेताच सिद्धार्थ म्हणाला…

आलिया भट्टसोबतच्या रिलेशनशिपनंतर सिद्धार्थचं नाव जॅकलिन फर्नांडिससोबतही जोडलं गेलं होतं.

कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, Sidharth Malhotra , Kiara Advani

‘लस्ट स्टोरिज’ या वेब सीरिजनंतर एक नाव बरंच चर्चेत आलं ते म्हणजे अभिनेत्री कियारा आडवाणीचं. करण जोहर दिग्दर्शित ‘लस्ट स्टोरिज’च्या एका भागातून झळकलेल्या कियाराने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर आपला ठसा उमटवला. अशी ही अभिनेत्री सध्या तिच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणामुळेही अनेकांचं लक्ष वेधत आहे. काही दिवसांपासूनच आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मुख्य म्हणजे आता माध्यमांमध्येही ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली असून, सिद्धार्थला एका कार्यक्रमादरम्यान याविषयीचा एक प्रश्नही विचारण्यात आला. ज्यावेळी त्याचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. एका रग्बी सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या रिलेशनशिपविषयी विचारण्यात आलं. त्या प्रश्नाचं उत्तर देत तो म्हणाला, ‘सध्यातरी मी माझ्या कामासोबतच रिलेशनशिपमध्ये आहे. इतर गोष्टींसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाही.’ त्याच्या या उत्तरामुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या खऱ्या. पण, हे उत्तर देत असताना त्याच्या चेहऱ्यावर असलेलं मिश्किल हास्यही बरंच काही सांगून गेलं. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय काय, हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

आलिया भट्टसोबतच्या रिलेशनशिपनंतर सिद्धार्थचं नाव जॅकलिन फर्नांडिससोबतही जोडलं गेलं होतं. पण, त्यातही सध्याच्या घडीला मात्र कियारासोबतच्या त्याच्या नात्याच्या चर्चा जास्त पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता बी- टाऊनला नवं कपल मिळणार की यासुद्धा चर्चाच ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 9:37 am

Web Title: watch how bollywood actor sidharth malhotra blushes at the mention of his alleged relationship with kiara advani
Next Stories
1 VIDEO : अन् चाहतीच्या मदतीस धावला रणवीर
2 व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी चित्रपट अनुदानासाठी अपात्र ठरणार !
3 फ्लॅशबॅक : दम मारो दम…
Just Now!
X