कंगना राणावर ही अशी अभिनेत्री आहे जी नेहमी आपल्या चहत्यांना आश्चर्याचे धक्के देणे पसंत करते. ‘क्वीन’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा ती याची पुनरावृत्ती करत आहे. चित्रपटात ती नव-वधूची भूमिका साकारत आहे. यातील ‘लंडन ठुमका’ या गण्यात ती नववधूच्या पोषाखात दिसते. तिच्या आजुबाजुला लग्नसोहळ्याचे वातावरण आहे. गाण्याचे बोल नटखट असून, संगीत ठुमकेबाज आहे. ज्याच्या तालावर ऐकणाऱ्याचे पाय नक्कीच थिरकतील. या गाण्याचा व्हिडिओत नववधू कंगना कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर धमाल नृत्य करताना दिसते.