06 March 2021

News Flash

Trailer : परिकथेपासून ते अडल्ट फिल्म्सपर्यंतचा सनीचा प्रवास पुन्हा उलगडणार…

पॉर्नस्टार झाल्यानंतर सनीचं बदललेलं आयुष्य, तिच्या कुटुंबाला कराव्या लागणाऱ्या अडचणींचा सामना असे अनेक चढउतार यात पाहायला मिळणार आहेत.

Karenjit Kaur The Untold Story of Sunny Leone Season 2 trailer

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिक वेबसिरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रदर्शित होत आहे. ‘बिगबॉस’ या रिअॅलिटी शोमधून भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेली अभिनेत्री सनी लिओनी हिच्या आयुष्यावर आधारित ही वेबसिरिज आहे. पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या सिरिजच्या दुसऱ्या भागात सनीचं खासगी आयुष्य आणि प्रेमप्रकरण उलगडत जाणार आहे.

बॉलिवूडमध्ये येऊन सनीला बरीच वर्षे उलटली, मात्र पॉर्नस्टार ही तिची जुनी ओळख अजूनही कायम आहे. ही ओळख घेऊन भारतात वावरणं नक्कीच सोप्प नव्हतं. शिख कुटुंबात वाढलेली करनजीत कौर ही पॉर्नस्टार सनी लिओन झाली कशी? तिचा हा प्रवास पहिल्या भागात पाहायला मिळाला आता तिच्या आयुष्यातली पुढचा टप्पाही उलगडत जाणार आहे.

सनीनं सर्वोत्तम मुलगी व्हावं, आदर्श पत्नी व्हावं अशी तिच्या आईची इच्छा असते मात्र सनी वेगळाच मार्ग पत्करते. पॉर्नस्टार झाल्यानंतर सनीचं बदललेलं आयुष्य, तिच्या कुटुंबाला कराव्या लागणाऱ्या अडचणींचा सामना, आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी धडपडणाऱ्या आईची तगमग असे अनेक चढउतार यात पाहायला मिळणार आहेत. सनीच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा पैलु म्हणजे पती डॅनिअलची गोष्टही याच सिझनमधून उलगडणार आहे.

दुसऱ्या सिझनचं शूट करताना भूतकाळात घडलेल्या घटना मला पुन्हा नव्यानं जगता आल्या. काही गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. आयुष्य पुन्हा नव्यानं जगण्याची संधी मला या वेबसिरिजनं दिली अशी प्रतिक्रिया सनीनं दिली आहे.

१६ जुलै रोजी या वेब सीरिजचा पहिला भाग ZEE5 India वर प्रदर्शित झाला. तर दुसरा भाग हा १८ सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 12:26 pm

Web Title: watch karenjit kaur the untold story of sunny leone season 2 trailer
Next Stories
1 बिग बींसाठी लेकीने तयार केलं ‘हे’ खास गिफ्ट
2 हृतिक रोशन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल
3 त्या चर्चा खोट्याच, दिशाला हृतिकसोबत काम करण्याची संधी मिळालीच नव्हती
Just Now!
X