बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नृत्यातील तिच्या मनमोहक अदांसाठी प्रसिद्ध आहे. तर बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिसुद्धा तिच्या कौशल्यपूर्ण नृत्यासाठी ओळखली जाते. या दोन तारकांनी ‘डान्स दिवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या धमाकेदार नृत्याने प्रेक्षकांना भारावून सोडले. ‘डोला रे डोला’ व ‘पिंगा गं पोरी’ या एकमेकींच्या गाण्यावर दोघींनी मिळून नृत्य सादर केलं.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा गं पोरी’ या गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘डोला रे डोला’ या गाण्यावर माधुरी व ऐश्वर्या राय बच्चन तर ‘पिंगा’ गाण्यावर दीपिका पदुकोण प्रियांका चोप्रा थिरकले होते. आगामी ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्रियांकाने ‘डान्स दिवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये माधुरी परीक्षक आहे. आपल्या नृत्यकौशल्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या तारका एकाच मंचावर असल्यावर एकत्र नृत्य सादर करण्याची मागणी होणार नाही हे अशक्यच! यावेळी दोघींनीही अप्रतिम नृत्य सादर केलं.

https://www.instagram.com/p/B21p_4MFq8N/

https://www.instagram.com/p/B2171jDh9p3/

Video: ‘राम तेरी गंगा मैली’च्या मंदाकिनीचा टिक-टॉक व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात प्रियांकाने झायराच्या आईची भूमिका साकारली आहे.