06 March 2021

News Flash

VIDEO: अनिल कपूरच्या मुलाची बॉलीवूडमध्ये दमदार एण्ट्री, ‘मिर्झया’चा टीझर प्रदर्शित

हर्षवर्धनच्या भूमिकेविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये हर्षवर्धन सुरूवातीला एका बाईकवरून मुलीचा अर्थात अभिनेत्री सैयमी खेर हिचा पाठलाग करताना दिसतो.

अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन बॉलीवूडमध्ये दमदार एण्ट्री करण्यासाठी सज्ज झाला असून, त्याच्या ‘मिर्झया’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झया’ चित्रपटात हर्षवर्धनच्या भूमिकेविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. हर्षवर्धनचा चित्रपटातील लूक अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

चित्रपटाच्या टीझरमध्ये हर्षवर्धन सुरूवातीला एका बाईकवरून मुलीचा अर्थात अभिनेत्री सैयमी खेर हिचा पाठलाग करताना दिसतो. तर कधी दोघंही एकत्र बाईकवरून फेरफटका मारताना दिसून येतात. त्यानंतर घोड्यावर स्वार झालेला सैनिक हाती धनुष्य घेऊन लक्ष्याचा वेध घेताना दिसून येतो, पण या दृश्यात हर्षवर्धनचा चेहरा लपविण्यात आला आहे.

चित्रपटाचा टीझरला गुलजार यांच्या नावाने सुरूवात होते. गुलजार यांनी या चित्रपटाची पटकथा लिहीली आहे, तर संगीतकार शंकर एहेसान लॉय यांनी संगीत दिले आहे. टीझर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवणारा असून, हर्षवर्धनच्या लूककडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाबाबत आणखी उलगडा होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ७ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

टीझर-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 2:57 pm

Web Title: watch mirzya teaser trailer released shows harshvardhan kapoor saiyami khers intimate scene
Next Stories
1 मोदींना निहलानींसारख्या चमच्यांची गरज नाही; केंद्राच्या भूमिकेने निहलानी तोंडघशी
2 चित्रिकरणासाठी ‘गेटवे’वर प्रवेशबंदी
3 दीपिकाने मानधन वाढवले, तीन दिवसांच्या शूटसाठी ८ कोटींची मागणी!
Just Now!
X