News Flash

सत्य घटनेवर आधारित ‘वीरगती’ वेब फिल्म प्रजासत्ताक दिनी प्रेक्षकांच्या भेटीला

'लागीरं झालं जी' मालिकेमधील 'फौजी विक्रम' प्रमुख भूमिकेत

वेब फिल्ममध्ये निखिल एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

देशभक्तीनं नुसतंच भारावून न जाता हाती तिरंगा घेऊन वीरगती पत्करणाऱ्या झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेमधील ‘फौजी विक्रम’च्या व्यक्तिरेखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळाली. फौजी विक्रम उर्फ विक्या उर्फ निखिल चव्हाण या गुणी कलावंताचा सुरु झालेला अभिनयक्षेत्रातील हा प्रवास त्यानं साकारलेल्या भूमिकेइतकाच रोमांचकारी आहे. विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांतून आपल्या भेटीस आलेला निखिल प्रत्येक भूमिकेत समरस होताना दिसतो. अलीकडे आलेल्या त्याच्या ‘स्त्रीलिंग पुल्लिंगी’ या वेबसीरिजची चर्चा सध्या चांगलीच रंगली असताना, त्याची आणखी एक वेब फिल्म लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. झी ५ ओरिजनल प्रस्तुत ‘वीरगती’ या सत्यकथेवर आधारित वेब फिल्म मधून निखिल आपल्याला एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिराम भडकमकर ह्यांची गोष्ट आहे तर इर्फान मुजावर आणि ऋषिकेश तुराई चे संवाद लेखन आहे, राजू देसाई आणि विशाल देसाई दिग्दर्शित ही वेब फिल्म ‘प्रजासत्ताक दिनी’ म्हणजेच २६ जानेवारीला प्रेक्षकांना पाहता येईल. निखिलने आजवर साकारलेल्या भूमिकांमध्ये आपलं सर्वस्व झोकून देऊन काम केलं. भूमिकेची लांबी ना मोजता भूमिकेची खोली जाणून घेतली म्हणूनच त्याने साकारलेल्या छोट्या-छोट्या भूमिकाही विशेष लक्षणीय ठरल्या. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज असा चौफेर वावर असणाऱ्या निखिलला ‘वीरगती’तील आर्मी ऑफिसर ‘लेफ्टनंट सलीम शेख’ या व्यक्तिरेखेद्वारा आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.. या वेब फिल्म मध्ये निखिल मुख्य भूमिकेत दिसणार असून आर्मी ऑफिसर ‘ सलीम शेख’ ला सुद्धा केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून उदंड प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 10:07 am

Web Title: watch official trailer of veergati evolves around the quest of struggle that plunges into a life of the martyr
Next Stories
1 ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ यांना ऑस्करची दहा नामांकने
2 ‘झूठा कहीं का’ चित्रपटातील गाण्यासाठी सनी लिओनी होणार मत्स्यकन्या
3 सारा-सुशांत बी-टाऊनचे नवीन ‘लव्ह-बर्ड्स’?
Just Now!
X