News Flash

TRAILER : सुवासिक प्रेमकहाणीचा थरारक ‘परफ्युम’

प्रेमकहाणीला कसं थरारक वळण लागतं याची कथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मनाला मोहून घेणाऱ्या परफ्युममुळे कॉलेजवयीन नायक-नायिका एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कसं थरारक वळण लागतं याचं चित्रण ‘परफ्युम’ या चित्रपटाद्वारे पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे.

कॉलेजमध्ये सुगंधित परफ्युमपासून सुरू झालं कथानक वेगवान आणि थरारक वळणं घेत पुढे सरकतं आणि त्या प्रेमीयुगुलाचं काय होतं, त्यांचं प्रेम यशस्वी ठरतं का असे अनेक प्रश्न हा ट्रेलर उपस्थित करतो. म्हणूनच या चित्रपटाविषयी आता उत्कंठा निर्माण झाली आहे. १ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी ‘परफ्युम’ हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. करण तांदळे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे.

ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 1:59 pm

Web Title: watch omkar dixit monalisa bagal perfume official trailer
Next Stories
1 ‘या’ चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र येणार नवाज-सोनाक्षी
2 प्रियांका चोप्रा गर्भवती? आई मधू चोप्रा म्हणते…
3 कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ने गाठला १०० कोटींचा टप्पा
Just Now!
X