बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिचा आगामी चित्रपट ‘रुही’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळते. ती प्रत्येक इवेंटमध्ये तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांची मने जिंकते. दरम्यान एका प्रमोशनल इवेंटनंतर जान्हवीने कारमध्येच कपडे बदलले आहेत. खुद्द जान्हवीने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये तिने स्ट्रॅपलेस टॉपवर ओवरसाइज बो आणि हाय वेस्ट मिनी स्कर्ट परिधान केला आहे. त्यावर तिने हाय हिल्स आणि छान असे कानातले परिधान केले आहेत. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

दुसऱ्या फोटोमध्ये जान्हवी कारमध्ये जीन्स घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. जान्हवीला प्रमोशनल इवेंटनंतर लगेच फ्लाइट पकडायची होती. त्यामुळे तिला कॅज्युअल कपडे परिधान करायचे होते. हे फोटो शेअर करत जान्हवीने ‘अत्यंत आरामदायी दिवस होता’ असे कॅप्शन दिले आहे.

आज ११ मार्च रोजी जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘रुही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘रुही-आफजा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता ‘रुही’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कॉमेडीचा तडका देण्यासाठी ‘रुही’ चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्मा आहे. तसेच पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना देखील चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहताने केले आहे.