27 September 2020

News Flash

Detective Pikachu Trailer : पिकाचू झाला हेर !

लहानग्यांचा सर्वात आवडता पिकाचू नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Detective Pikachu trailer

‘पॉकेमन’ हे सर्वात लोकप्रिय कार्टुन, त्यानंतर याच कार्टुनवर आधारित मोबाईल गेमही आला. या गेमनं तर अक्षरश: तरुणाईला वेड लावलं होतं. आता याच पॉकेमनवर आधारित चित्रपटही लवकर येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चरनं ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच केला आहे. आतापर्यंत कार्टुनमध्ये पाहिलेला अॅशचा लाडका पिकाचू या चित्रपटात हेरच्या भूमिकेत दिसणार आहे.

पॉकेमनमधलं पिवळ्या रंगाचं पिकाचू हे कॅरेक्टर सर्वांच्याच आवडीचं त्यामुळे ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’मध्ये हाच लोकप्रिय पिकाचू नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्तही मूळ पॉकेमन सीरिजमधले अनेक पॉकेमन या चित्रपटातून पाहता येणार आहे. ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’ची कथा ही टीम गुडमन या पॉकेमन ट्रेनर भोवती फिरते. पेशानं हेर असलेले टीमचे वडील कार अपघातानंतर अचानक नाहिसे होतात. त्यांचा शोध घेत टीम एका शहरात येतो आणि इथेच त्याची भेट पिकाचूशी होते. हे दोघंही एकत्र येत टीमच्या वडिलांचा शोध घेतात साधरण या कथेवर ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’आधारलेला आहे.

लोकप्रिय अभिनेता रायन रेनॉल्ड यांनी पिकाचूला आवाज दिला आहे. तर रॉब लेटरमननं या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून जस्टीस स्मिथ टीमच्या भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 4:57 pm

Web Title: watch pokemon detective pikachu trailer launch
Next Stories
1 …म्हणून बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन
2 ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेत ‘राधा’ पर्वाची सुरुवात
3 दीप-वीरनं उतरवला विवाहसोहळ्याचा विमा
Just Now!
X