News Flash

पाहाः ‘बाजीराव मस्तानी’मधील दीपिका-प्रियांकाचे ‘पिंगा’ गाणे

दीपिका आणि प्रियांकावर चित्रीत करण्यात आलेल्या 'पिंगा' गाण्याचा व्हिडिओ इरॉसने प्रदर्शित केला आहे.

'पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा'

बहुप्रतिक्षित ‘बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा गाणयाचा फर्स्ट लूक शनिवारी प्रदर्शित करण्यात आला होता. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘पिंगा’ गाण्याचा व्हिडिओ इरॉसने प्रदर्शित केला आहे.
‘पिंगा’ हे गाणे शनिवारीचं प्रदर्शित करण्यात येणार होते. पण, पॅरिस हल्ल्यामुळे या गाण्याचे लॉन्च पुढे ढकलण्यात आले. मात्र, इरॉसने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा’ असे गाण्याचे बोल असून, दीपिका आणि प्रियांकाने त्यांच्या नृत्यअदाकारीने या गाण्यास परिपूर्ण केलेयं. या गाण्यात किरमिजी रंगाच्या नववारी साड्या दोघींनी नेसल्या असून, त्यावर पेशवाई दागिने परिधान केले आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन रेमो डिसूझाने केले आहे. पिंगा गाण्यात दोन्ही अभिनेत्रींमध्ये हलकिशी जुगलबंदी दाखविण्यात आली असली तरी या दोन्ही अभिनेत्री नृत्याच्या बाबतीत उजव्याचं ठरल्या आहेत.
रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आणि संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट येत्या 18 डिसेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2015 2:26 pm

Web Title: watch priyanka chopra and deepika padukons pinga song from bajirao mastani
Next Stories
1 ‘प्रेम रतन धन पायो’ची शंभर कोटीच्या क्लबमध्ये वर्णी
2 फक्त भव्य सेट्स..
3 प्रथमच हिंदी मालिकेत भार्गवी चिरमुले
Just Now!
X