News Flash

पाहाः राधिका आपटेच्या ‘फोबिया’चा थरारक ट्रेलर

एगोराफोबिया या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे.

पाहाः राधिका आपटेच्या ‘फोबिया’चा थरारक ट्रेलर

बॉलीवूडमधील चित्रपट अभिनेत्री राधिका आपटे हिला ‘मॅडली’ या संकलित चित्रपटातील कामगिरीसाठी या वर्षीच्या त्रिबेका चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘बदलापूर’ ,’मांझी द माउंटन मॅन’, ‘लय भारी’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू चालविणारी राधिका फोबिया या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘फोबिया’ या चित्रपटात राधिका ही एगोराफोबिया या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. हा आजार असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक स्थळी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते. एका रात्री तिच्यासोबत अशी काही घटना घडते की ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. विकी रजनीच्या सायकोलॉजीकल थिमवर आधारीत ‘फोबिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे.
‘फोबिया’ चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2016 4:44 pm

Web Title: watch radhika apte starring phobia trailer
टॅग : Radhika Apte
Next Stories
1 शाहीद-रणवीर बॉलीवूडचे नवे राम-लखन
2 वाद ही सलमानसाठी नवीन गोष्ट नाही- कतरिना कैफ
3 जाणून घ्या ‘बाहुबली- २’साठी राणा डग्गूबती कशी करतोय तयारी..
Just Now!
X