News Flash

VIDEO: करिनासोबतच्या पहिल्याच भेटीत रणवीरने दाखवला नखरा

९ डिसेंबरला रणवीर आणि वाणीचा हा बहुचर्चित 'बेफिक्रे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

करिना कपूर, रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंग सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘बॅण्ड बाजा बारात’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर रणवीरने आजवर विविध चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूड वर्तुळात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक चित्रपटानंतर रणवीरच्या चाहत्यांच्या आकड्यातही वाढ होत आहे. आपल्या मनमिळाऊ आणि खोडकर स्वभावाने अनेकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता करिना कपूरचा मोठा चाहता होता असे त्याने नुकतेच म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीतर्फे नुकतेच आयोजित केलेल्या टॉक शो मध्ये रणवीरने त्याच्या आणि करिनाच्या पहिल्या भेटीबद्दलचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीरने त्या संपूर्ण प्रसंगाची पुनरावृत्तीच केली. ‘करिनाला भेटल्यावर माझे डोळे तिच्यावरच स्थिरावले होते. ती माझी आवडती अभिनेत्री होती. पण, त्यावेळी मी तिला पाहताच जरा जास्तच व्यक्त होत माझे भाव व्यक्त करत असताना त्यामध्ये अतिशयोक्तीच होती’, असे रणवीर म्हणाला. दरम्यान सध्या रणवीर आणि करिनाच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगावर भाष्य करणारा एक व्हिडिओ ट्विटरद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्या प्रसंगाची आठवण सांगून शांत न राहता रणवीरने प्रेक्षकांमधील एका मुलीला व्यासपीठावर बोलवत तो प्रसंग कसा घडला होता हे स्पष्ट केले. यावेळी रणवीरने बेबोसमोर ज्या नखरेल आणि ‘ड्रामा क्वीन’ अंदाजात व्यक्त होत अनेकांना अचंबित केले होते, अगदी तसाच अभिनय केला. रणवीरचा हा नखरेल अंदाज पाहून तेथे उपस्थित प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. दरम्यान अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. ‘बेफिक्रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये दोन अशा पात्रांची कथा साकारण्यात आली आहे जे एकमेकांच्या नात्याला प्रेम आणि नात्याचे, रिलेशनशिपचे नाव देऊ इच्छित नाहित. त्यामुळे येत्या काळात रणवीरने साकारलेला ‘धरम’ आणि वाणीने साकारलेली ‘शायरा’ प्रेक्षकांना कितपत भावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ९ डिसेंबरला रणवीर आणि वाणीचा हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:08 pm

Web Title: watch ranveer singh shows off his drama queen side during his first meet with kareena kapoor khan
Next Stories
1 VIDEO: ‘डॅडी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
2 ‘दंगल’ होणार करमुक्त?
3 सलमानला ‘दंगल’ चित्रपट दाखवण्यासाठी आमिर उत्सुक
Just Now!
X