News Flash

पाहाः ‘लय भारी’ सलमान ‘भाऊ’

सलमान खान मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याची गेले कित्येक दिवस चर्चा सुरु होती.

| July 7, 2014 02:41 am

सलमान खान मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याची गेले कित्येक दिवस चर्चा सुरु होती. रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या ‘लय भारी’ चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, सलमानचा लूक अद्यापपर्यंत प्रदर्शित करण्यात आला नव्हता. आजचं रितेशने ट्विटर आणि त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक प्रोमो प्रदर्शित केला. यात सलमान मराठी माणसाच्या पोशाखात दिसतो. ” ‘लय भारी’त सलमान खान. सलमान खान धन्यवाद भाऊ” असे रितेशने ट्विट केले.
लयभारी’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची इच्छा सलमान खाननेच रितेशकडे व्यक्त केली होती. सलमानची आई सलमा खान यांना मराठी उत्तमपणे कळते. त्यामुळे आपल्या मुलाने मराठी चित्रपटात काम केल्याने आईला आनंद होईल, हे जाणवल्यानेच सलमानने आमच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे रितेशने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. स्वतः रितेशही या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रितेशची निर्मिती असलेला ‘लय भारी’ ११ जुलैला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 2:41 am

Web Title: watch salman khan in lai bhaari
Next Stories
1 ‘सिंघम रिटर्न्स’चे मोबाईल अॅप!
2 ‘दयाबेन’च्या गरब्याच्या ठेक्यावर ‘सीआयडी’ नाचणार
3 ‘झुंज’मध्ये दोन नवीन लढवय्यांचा प्रवेश
Just Now!
X