बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान चित्रपटातून धाडसी दृष्ये साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलिकडेच सलमान खानचा अभिनय असलेली एका शितपेयाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपल्या नेहमीच्या धडाडीच्या वृत्तीप्रमाणे या जाहिरातीतदेखील सलमान थरारक दृष्य साकारताना दिसतो. आपले आवडते शितपेय मिळविण्यासाठी सलमान खान एका सुंदर मुलीबरोबर विमानातून उंचावरून उडी मारताना आपल्या दृष्टीस पडतो. उंचावरून खाली येत असताना सलमान चक्क जीपमध्ये उभा राहून पायाने जीपचे स्टेअरिंग नियंत्रित करतो आणि पॅराशुटच्या मदतीने जीप जमिनीवर उतरवतो. सलमानच्या लहानग्या चाहत्यांना ही जाहिरात नक्कीच आवडेल. परंतु, कृपया घरी असे काही धाडस करण्याचा प्रयत्न करू नका.