06 July 2020

News Flash

‘प्रेम’ळ सलमान आणि सोनमची नृत्य अदाकारी, पाहा ‘प्रेम रतन धन पायो’चे ‘टायटल साँग’

चित्रपटात सलमान आणि अभिनेत्री सोनम कपूर या दोघांसह अभिनेत्री स्वरा भास्कर देखील दिसणार आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झाले.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असून चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात सलमान आणि अभिनेत्री सोनम कपूर या दोघांसह अभिनेत्री स्वरा भास्कर देखील दिसणार आहे. अभिनेत्री सोनम कपूर आपल्या नृत्य अदांनी ‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यात लक्ष वेधून घेते पण तब्बल १६ वर्षांनी ‘प्रेम’ नावाच्या भूमिकेत कमबॅक करणारा सलमानच या गाण्यात भाव खाऊन जातो. हे गाणे गायिका पलक मुच्छलने गायले असून संगीतकार हिमेश रेशमियाने गाण्याला संगीत दिले आहे.

‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचे टायटल साँग माझ्यासाठी खास असून इर्शादजी यांनी अतिशय सुंदरपणे गाण्याचे बोल लिहीले आहेत. हे गाणे मिराबाई यांच्या ‘राम रतन धन पायो’ गाण्याच्या सन्मानार्थ आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी सांगितले. ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपट पुढील महिन्यात १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2015 3:28 pm

Web Title: watch salman khan sonam kapoor in prem ratan dhan payo title track
टॅग Salman Khan
Next Stories
1 अंबरनाथकरांनीच मला घडवले
2 मृत मुलाच्या दर्शनाने स्टॅलोन अस्वस्थ, हरिद्वारमध्ये केले श्राद्ध
3 काजोल आणि मी जगातील अत्यंत वाईट डान्सर – शाहरूख खान
Just Now!
X