संपूर्णपणे नृत्यकौशल्यावर आधारित असलेल्या ‘एबीसीडी’ चित्रपटाचा सिक्वल म्हणजे तितकाच दमदार आणि नृत्य चाहत्यांसाठी पर्वणी ठरवा यासाठी अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या दोघांनीही अविरत मेहनत घेतली असल्याचे चित्रपटाच्या गाण्यांवरून लक्षात येत आहे. नुकतेच वरुण धवनच्या दमदार नृत्याचा तडका असलेले या चित्रपटातील ‘बेजूबा फिरसे’ गाणे प्रदर्शित झाले होते. गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता श्रद्धा कपूरच्याही दिलखुलास नृत्याचा जलवा ‘सून साथिया’ गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्यातील श्रद्धाची नृत्य अदाकारी पाहून सिक्वल रसिकांसाठी अद्भूत नृत्याची पर्वणी ठरणार आहे.