News Flash

VIDEO: ‘स्पायडर मॅन होमकमिंग’चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'आयर्न मॅन' फेम अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर (टोनी स्टार्क) दिसत आहे.

छाया सौजन्य- ट्विटर

स्पायडर मॅन या चित्रपटाच्या पुढच्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेलरच्या रुपाने चाहत्यांना ख्रिसमसपूर्वीच हे खास गिफ्ट मिळाले आहे असे म्हणावे लागेल. ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘आयर्न मॅन’ फेम अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर (टोनी स्टार्क)  दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामध्ये टोनी स्टार्कही झळकणार आहे अशा चर्चा रंगत होत्या. या चित्रपटामध्ये तो एका छोटेखानी भूमिकेत दिसणार असल्याचेच म्हटले जात होते. पण, चित्रपटाचा ट्रेलर पाहून तरी असे दिसत नाहीये. या ट्रेलरमध्ये टोनी स्टार्कची काही दृश्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत.

स्पायडर मॅनच्या भूमिकेत आहे नवोदित अभिनेता टॉम हॉलांड. जगाला वाचविण्यासाठी एखाद्या मोहिमेवर निघालेला हा टॉम चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याच्या या मोहिमेमध्ये आणि अभ्यासामध्ये चांगलाच समतोल राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मार्वल स्टुडिओज आणि कोलंबिया पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक जॉन वॉट्सने या चित्रपटामध्ये प्रेक्षकांसाठी नक्कीच काहीतरी नवीन थरार आणि नवे कथानक सादर करण्याची तयारी केली आहे हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येत आहे.

हॉलिवूड चित्रपट आणि सुपरहिरोंविषयी प्रेक्षकांच्या मनात असणारे कुतुहल आणि उत्सुकता लक्षात घेत हा स्पायडर मॅन अनेकांचीच दाद मिळवण्यासाठी सज्ज होत आहे. पुढील वर्षी ७ जुलै २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि प्रकेक्षकांसाठी धमाकेदार मनोरंजनाची मेजवानी या समीकरणाने आता चांगलाच तग धरला आहे. त्यामुळे ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुर्तास यंदाचा ख्रिसमससाठी स्पायडर मॅनच्या या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना चांगलीच भेट मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:22 pm

Web Title: watch spider man homecoming trailer spidey learns to superhero from iron man
Next Stories
1 नशेत धुंद असलेल्या मलायकाने केला सोनमचा अपमान
2 होय, मी त्याच्याशी पैशासाठी साखरपुडा केला- राखी सावंत
3 नेटिझन्सच्या पसंतीस पडला आदित्य चोप्राचा ‘बेफिक्रे’ प्रयोग
Just Now!
X