ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेहमीच कोणतीतरी हटके वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आपल्याला प्रत्येक वेब सीरिजमध्ये नेहमीच काही तरी नवीन पाहायला मिळतं. कोणत्या शाळेतल्या किंवा कॉलेजच्या मुलांवर आधारीत टीन ड्रामा नेहमीच पाहायला मिळतो. त्यात आता हंगामा प्लेवर अशीच एक वेब सीरिज येणार आहे. ‘निम्मीज पीजी’ असं या सीरिजचे नाव आहे.
ही सीरिज कोणत्या कॉलेज किंवा शाळेतील मुलांवर नाही तर पेइंग गेस्ट म्हणजे पीजी राहणाऱ्या मुलींवर आधारीत आहे. पीजी मध्ये एका घरात लोक कसे राहतात यावर याची पटकथा आहे. कुणाचीही पर्वा न करणाऱ्या बिनधास्त स्वभावाच्या तीन सिंगल मुली आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या इतकी भन्नाट मालकीण यावर ही मालिका आहे. ही सीरिज कॉमेडी-ड्रामा आहे. ही सीरिज पाहून नक्कीच तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही आहे.
दिल्लीतील निम्मी आंटीच्या घरात तीन सिंगल मुली पेइंग गेस्ट म्हणून राहतात. लेट नाईट पार्ट्यांपासून त्यांचे मूर्ख बॉयफ्रेंड्य आणि त्यांचे अनेक सिक्रेट्स असं यांच गणित अडकल्या सारखं झालं आहे. पीजी मध्ये राहणे म्हणजे मस्तीमज्जेच वातावरण आहे.
ABUZS ओरिजनलची निर्मिती असलेल्या ‘निम्मीज पीजी’चे दिग्दर्शन नितेश सिंग यांनी केलं आहे. हंगामा प्ले आणि पार्टनर नेटवर्क्सवर आता स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री नताशा फुकन, आंचल अग्रवाल, मीनू पांचाल, कुलबीर बदरसन आणि अभिनेता भावशील सिंग साहनी हे मुख्य भूमिका साकारणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 10:17 am