News Flash

टायगर श्रॉफचं वर्कआऊट पाहून व्हाल थक्क; फिट राहण्यासाठी करतो ‘ही’ मेहनत

टायगर श्रॉफने शेअर केलेला 'हा' व्हिडीओ पाहिलात का?

खासकरुन अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. बऱ्याच वेळा टायगर त्याच्या अॅक्शन सीनसोबतच फिटनेसमुळेदेखील चर्चेत असतो. बऱ्याच वेळा तो सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊटचे काही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने पुलअप्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पुलअप्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे फिट राहण्यासाठी टायगर विशेष मेहनत करत असल्याचं या व्हिडीओवरुन लक्षात येत आहे. त्यामुळे सध्या अनेक जण त्याच्या या मेहनतीचं कौतूक करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

दरम्यान, टायगर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून तो कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अलिकडेच त्यांचं अनबिलिव्हेबल हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. टायगर लवकरच हिरोपंती २ या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी त्याने ‘हिरोपंती’ या चित्रपटाच्या माध्यमातून २०१४ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘बागी’, ‘वॉर’,’मुन्ना मायकल’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, अशा काही चित्रपटांमध्ये झळकला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 12:35 pm

Web Title: watch tiger shroff shares fitness video people surprised dcp 98 ssj 93
Next Stories
1 KBC 12: स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाला सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?
2 दुर्गा मातेसोबत होतेय सोनू सूदची पूजा; चाहत्यांचं प्रेम पाहून अभिनेता झाला भावूक
3 ‘भावड्याची चावडी’ या कार्यक्रमातून पार्थ पहिल्यांदाच झळकणार मराठी टेलिव्हिजनवर
Just Now!
X