06 August 2020

News Flash

पाहा : बॉक्सर विजेन्द्र सिंगच्या ‘फग्ली’ चित्रपटाचा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या निर्मिती संस्थेद्वारे बनविलेला 'फग्ली' चित्रपट तयार झाला असून, भारताला ऑलेम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा विजेन्द्र सिंग, सोनम आणि अर्जुन कपूरचा भाऊ मोहित

| April 7, 2014 07:41 am


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या निर्मिती संस्थेद्वारे बनविलेला ‘फग्ली’ चित्रपट तयार झाला असून, भारताला ऑलेम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा विजेन्द्र सिंग, सोनम आणि अर्जुन कपूरचा भाऊ मोहित मारवा ही तरुणांची फौज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. वेगवेगळी जीवनशैली जगत असलेल्या विरेन्द्र सिंग, मोहित मारवा, अरफी लांबा आणि कायरा अडवाणी या चार मित्रांची ही कथा असून, जिमी शेरगील एका हरियाणवी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा विनोदी बाजाचा थरारक चित्रपट असल्याचे जाणवते. एक साधी घटना चुकीचे वळण घेऊन खंडणी, खून आणि घाणेरड्या राजकारणात परावर्तित होते. याआधी ‘बुलेट राजा’ चित्रपटात ‘यूपी का भैया’ व्यक्तिरेखेत दिसलेला जिमी शेरगील या चित्रपटात हरयाणवी पोलिसाची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो आपला खेळ चांगल्या प्रकारे जाणतो. चित्रपटात जिमी शेरगील साकारत असलेली हरयाणवी पोलिसाची भूमिका ट्रेरलरमध्येदेखील उठून दिसते, जी निश्चितच ट्रेलरची खास बाब ठरते. चित्रपटाचे संगीत वेगळ्या धाटणीचे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबिर सदानंद याचे आहे. टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती’ चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे प्रथम १६ मेला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता १३ जूनला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2014 7:41 am

Web Title: watch trailer boxer vijender singh in his debut flick fugly
Next Stories
1 युवराज सिंगच्या समर्थनार्थ बॉलिवूड सरसावले
2 ‘गब्बर’मध्ये करीना साकारणार अक्षयच्या पत्नीची भूमिका
3 अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा चित्रपटसृष्टीला रामराम?
Just Now!
X