News Flash

पाहाः कंगनाच्या ‘क्वीन’ चित्रपटाचा ट्रेलर

कंगना रणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्वीन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

| December 23, 2013 11:12 am

कंगना रणावतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘क्वीन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. राणी या पात्राची भूमिका कंगनाने साकारली आहे.
एक चुलबुली पण साध्या मुलीची भूमिका कंगनाने केली आहे. लग्नानंतर एकटीच हनीमूनला गेलेल्या राणीचा प्रवास चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. परदेशात हनीमूनला गेल्यावर समोर आलेल्या कठीण प्रसंगाना ती कशी सामोरे जाते हे यात पाहावयास मिळणार आहे.  ‘काय पो छे’ आणि ‘शहीद’फेम राजकुमार यादव आणि सुपर मॉडेल लिजा हेडन यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ पुढील वर्षी २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 11:12 am

Web Title: watch trailer kanagan ranaut in queen
टॅग : Kangana Ranaut
Next Stories
1 पाकिस्तानच्या मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर करिना!
2 बिग बॉस ७ : गौहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषाच्या नैतिकतेची परिक्षा
3 दोन दिवसात ‘धूम ३’ ची ६९.५८ कोटींची कमाई
Just Now!
X